Cotton Crop Loss: वेचणीला आलेला कापूस भिजला

Rain Update: मराठवाड्यातील बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत पावसाचा सिलसिला कायम आहे. काही भागांत हलक्या सरी तर काही ठिकाणी दमदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आष्टी तालुक्यात सर्वाधिक १७.६ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. -


October 29, 2025 Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांतील बहुतांश भागात पावसाचे कमी अधिक बरसने सुरूच आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत बीड जिल्ह्यातील काही तालुके व जालना, छत्रपती संभाजीनगरमधील काही मंडले वगळता अनेक भागांत पावसाने तुरळक, हलकी, मध्यम तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावली.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार, वडवणी, धारूर, केज हे तालुके वगळता बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई या तालुक्यांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. आष्टी तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. या तालुक्यात सरासरी १७.६ मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यात सरासरी ९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील मंठा तालुक्यात सरासरी १७.७ मिलिमीटर, घनसावंगीमध्ये १०.५ मिलिमीटर, बदनापूरमध्ये ६.९ मिलिमीटर, परतुरमध्ये ४.६ मिलिमीटरमध्ये, १३.२ मिलिमीटर, जालनात १६.३ मिलिमीटर, जाफराबादमध्ये २.३ मिलिमीटर, भोकरदनमध्ये सरासरी ६.६ मिलिमीटर पाऊस झाला. मंठा, जालना, अंबड तालुक्यांत पावसाचा जोर थोडा अधिक होता
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात सरासरी १६.७ मिलिमीटर, सोयगाव ४.३ मिलिमीटर, सिल्लोड १२.७ मिलिमीटर, खुलताबाद १९.५ मिलिमीटर, कन्नड ६.९ मिलिमीटर,वैजापूर १२.२ मिलिमीटर, गंगापूर १५.५ मिलिमीटर, पैठण १०.७ मिलिमीटर तर छत्रपती संभाजी तालुक्यात सरासरी १४.४ मिलिमीटर पाऊस झाला.
जिल्हानिहाय पावसाची मंडले

(पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर ः करमाड २२.३, लाडसावंगी ३५.८, शेकटा ३५.८, लोहगाव २०.३, मांजरी २३.८, शेंदूरवादा २६.५, तुर्काबाद २४.८, खंडाळा २१.५, शिऊर २५.८, बोरसर २५.८, वेरूळ ३०, बाबरा २६.३.

जालना ः वाघरूळ २४.३,विरेगाव २६, मंठा २४.८,पांगरी गोसावी २२.८.

बीड ः धामणगाव २५.३, दौलावडगाव २७, धानोरा २५.३.


Share to ....: 22    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 40195908

Saying...........
The number of a person-s relatives is directly proportional to his fame.





Cotton Group