जळगाव जिल्ह्यात पुन्हा नुकसान… पावसामुळे वेचणीवर आलेला कापूस भिजला !

जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच भागात शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी झालेल्या पावसाने शेतात वेचणीवर आलेला कापूस मोठ्या प्रमाणात भिजला आहे. आधीच सीसीआयची खरेदी केंद्रे वेळेवर सुरू न झाल्याने कापसाला बाजारात अपेक्षित भाव नाही. -


October 26, 2025 जळगाव : जिल्ह्यातील बऱ्याच भागात शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी झालेल्या पावसाने शेतात वेचणीवर आलेला कापूस मोठ्या प्रमाणात भिजला आहे. आधीच सीसीआयची खरेदी केंद्रे वेळेवर सुरू न झाल्याने कापसाला बाजारात अपेक्षित भाव नाही. त्यात पावसात भिजल्याने दर्जा खालावल्यानंतर खासगी व्यापारी कापसाचे भाव आणखी कमी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे केळी, कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून मदतीची घोषणा केली असली, तरी दिवाळी उलटल्यानंतरही बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. दरम्यान, खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर रब्बी पिकांपासून चांगल्या उत्पादनाची आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर दिवाळीनंतरच्या पावसाने आता पाणी फेरले आहे. पाडव्याच्या दिवशीही बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.


Share to ....: 196    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 40195895

Saying...........
The number of a person-s relatives is directly proportional to his fame.





Cotton Group