शेतकरी हवालदिल:कमी भावामुळे कापूस विकता येईना‎ तर खाजऱ्यामुळे साठवण्यास अडचण‎

... -


February 06, 2023 यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल‎ या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी‎ फेब्रुवारी महिना सुरू झाल्यावर देखील‎ कापूस विकला नसल्याने घरात साठवून‎ ठेवलेल्या कापसामध्ये किडे तयार होत‎ असून, या पिसा किडयामुळे‎ शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांच्या‎ अंगाला खाज सुटण्याचे प्रमाण वाढले‎ आहे. ग्रामीण भागात या रुग्णांच्या‎ संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली‎ आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन‎ संकट उभे राहिले आहे.‎ कापसाला जास्त भाव मिळत‎ नसल्यामुळे विकता देखील येत नाही.‎ तर दुसरीकडे त्यांच्यातील पिसा‎ किडयामुळे अंगाला सुटणाऱ्या‎ खाजमुळे कापूस घरात ठेवायलाही‎ आता शेतकरी तयार नसल्याने शेतकरी‎ दुहेरी अडचणीत सापडले आहेत.‎ खाजऱ्याच्या समस्येमुळे शेतकरीही‎ कंटाळले असून अनेक ठिकाणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेतकऱ्यांनी या त्रासामुळे कापूस विक्री‎ करण्यास सुरुवात केली आहे. काही‎ शेतकरी घरात कापूस असल्याने‎ रात्रीच्या वेळेस थंडीतही घराबाहेर‎ झोपणे पसंत करत आहेत.

काही‎ शेतकऱ्यांनी घरातील कापूस गोठ्यात‎ किंवा इतरत्र ठिकाणी हलवण्यास‎ सुरुवात केली आहे. कापसात अनेक‎ प्रकारचे कीटक तयार झाले असून‎ कापूस हे तंतुमय पीक आहे. त्यात नवीन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कापूस घरात ठेवल्यानंतर पंधरा दिवस‎ ते महिनाभरात हा कापूस विक्री न‎ झाल्यास दीड ते दोन महिन्यात‎ कापसामध्ये अनेक प्रकारचे किडे तयार‎ होत असतात यामध्ये बोंड अळीच्या‎ पतंगाचा समावेश आहे. त्यामुळे फार‎ काही त्रास होत नाही मात्र कापसामध्ये‎ डस्टी कॉटनबर्ग नावाचा किडा तयार‎ होतो हा किडा चावल्यानंतर अंगाला‎ खाज येऊन पुरळ उठतात.

सातत्याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ त्यांच्या संपर्कात राहिल्यास हा त्रास‎ वाढत जातो. विशेष म्हणजे लहान‎ मुलांसह ज्येष्ठ नागरिक व ज्यांना‎ ॲलर्जीची समस्या आहे, अशांना या‎ किटकांमुळे मोठ्या प्रमाणात त्रासाला‎ सामोरे जावे लागते. यंदा कापसाला दहा‎ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव‎ मिळेल या आशेवर शेतकरी आहे. परंतू‎ दिवसेंदिवस भाव कमी होत असल्याने‎ आर्थिक संकटांना सामोरे लागत आहे.‎

कापसापासून दूर झोपावे‎ कापसातील पिसा किडयामुळे अंगावर‎ खाज सुटत असल्याच्या रुग्णांचे प्रमाण‎ वाढत असून यावर औषधोपचार‎ आहेच, मात्र खबरदारी म्हणून त्यांचा‎ त्रास वाढल्यानंतर कापसापासून दूर‎ झोपावे. तसेच अंगावर पुरळ‎ उठल्यानंतरही किटकांचा संपर्क कायम‎ राहिल्यास हा त्रास वाढू शकतो, असे‎ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी‎ डॉ. दिपक सोन्नी यांनी सांगितले.‎


Share to ....: 321    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31710538

Saying...........
Misery no longer loves company; nowadays it insists on it.





Cotton Group