राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

>यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या कापसावर हंगामाच्या सुरुवातीलाच बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. -


August 03, 2021 राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या कापसावर हंगामाच्या सुरुवातीलाच बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला तर गेल्या हंगामाप्रमाणे या वेळी देखील पीक काढण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे खरीप लागवड क्षेत्र ९ लाख हेक्‍टरच्या आसपास आहे. यातील निम्म्या म्हणजेच पाच लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. सिंचन सुविधांचा अभाव असल्याने बहुतांश शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेतकरी या पिकाचे व्यवस्थापन करतात. गेल्या हंगामात जिल्ह्यात सर्वदूर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. काही भागात बोंडसडीमुळे पीक उध्वस्त झाले.एकरी एक किलोची उत्पादकता देखील काही शेतकऱ्यांना झाली नाही. या उलट बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता पीक काढावे लागले. या सर्व उपायानंतर देखील या वर्षी पुन्हा बोंडअळीने डोकेवर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. राळेगाव तालुक्‍यातील निधा येथील शेतकरी डॉ. ज्ञानेश्वर मुडे यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबीबोंड अळी दिसून आली. डॉ. मुडे यांनी लागवडीनंतर पिकाचे शिफारशीनुसार व्यवस्थापनावर भर दिला होता. सद्यःस्थितीत त्यांचे पीक फुलांवर आहे. मात्र २७ पैकी दहा एकर क्षेत्रातील कपाशीवर बोंडअळी दिसून आल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
कृषी अधिकाऱ्यांकडे कंपनीविरोधात तक्रार
या संदर्भाने त्यांनी राळेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे रीतसर तक्रार केली. त्यामध्ये कंपनीने केलेल्या दावा खोटा ठरल्याचे म्हटले आहे. कंपनीने ९० दिवसांत कोणत्याही कीडरोगाचा प्रादुर्भाव होणार नसल्याचा दावा केला होता. परंतु पीक लागवडीला ४५ ते ६० दिवस झाले असतानाच पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने बियाणे कंपनीवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
या तक्रारीची दखल कृषी विभागाने घेत तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षीत होते. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तहसीलदार यांनी या विषयाची गंभीरता लक्षात घेत तातडीने उपाययोजनांसाठी पंचायत आणि तालुका कृषी विभागाची संयुक्‍त बैठक बोलावली आहे.


Share to ....: 293    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31672253

Saying...........
Men, their rights, and nothing more; women, their rights, and nothing less.





Cotton Group