उत्कृष्ट काम करणार्या सूत गिरण्यांचा गौरव
महाराष्ट्रातील सहकारी सूत गिरण्यांना त्यांच्या सन
२००६-०७ व २००७-०८ या वर्षांमधील कामगिरीच्या आधारे पुरस्कार देऊन मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी गौरविण्यात आले. मुंबईमधील वर्ल्ड ट्रेड
सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुरस्कार प्राप्त सूत गिरण्यांची नावे पुढीलप्रमाणे :
१) शेतकरी महिला वस्त्रनिर्माण सहकारी सूत गिरणी लि.सांगोले, सोलापूर २) शेतकरी
सहकारी सूत गिरणी लि.सांगोले, सोलापूर ३) शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी
लि.इस्लामपूर, सांगली ४) स्वामी रामानंद भारती सहकारी सूत गिरणी लि.तासगाव,
सांगली ५) प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी लि.शिरपूर, धुळे ६) श्री स्वामी समर्थ
शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी लि.वळसंग, सोलापूर ७) बँरिस्टर शेषराव वानखेडे
सहकारी सूत गिरणी लि.नागपूर, नागपूर ८) जवाहर शेतकरी सहकारी सूत गिरणी लि.मोराने,
धुळे ९) बाबासाहेब केदार शेतकरी सहकारी सूत गिरणी लि.हिंगणा, नागपूर १०)
सागरेश्वर सहकारी सूत गिरणी लि.कडेगाव, सांगली ११) बाबासाहेब नाईक कापूस
उत्पादक सहकारी सूत गिरणी लि.पुसद, यवतमाळ १२) महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी
सूत गिरणी लि.पेठवडगाव, कोल्हापूर १३) इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणी लि.
इचलकरंजी, कोल्हापूर १४) लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणी लि.
शहादा, नंदुरबार १५) महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ कर्मचारी शेतकरी सहकारी
सूत गिरणी लि.अकोला १६) कृष्णा-वेरळा मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी लि.पलूस,
सांगली १७) रोकडेश्वर सहकारी सूत गिरणी लि.वसमतनगर, हिंगोली १८) प्रियदर्शिनी
सहकारी सूत गिरणी लि.लोहारा, यवतमाळ आणि १९) श्री संत गाडगे महाराज सहकारी सूत
गिरणी लि.अकोला.