कापूस, गाठींच्या उत्पादनातील तूट 50 लाख़ांवर |
|
जळगाव दि 28-जिल्हयात ख़ाजगी व्यापा-यांकडून आतापर्यंत सुमारे 22 लाख़ क्विंटल
कापूस ख़रेदी करण्यात आली आहे
. यातून सुमारे 10 अब्ज रुपयांची उलाढाल झाली असून,
चार लाख़ गाठींचे (175 किलो) उत्पादन झाले आहे, त्याच वेळी राज्यात ख़ाजगी
व्यापा-यांकडून 140 लाख़ क्विंटल कापसाची ख़रेदी झाली असून केवळ 50 लाख़ गाठींचा
उत्पादन झाले आहे, दरम्यान एक कोटी गाठींच्या उत्पादनाच्या अपेक्षेला धक्का
बसण्याची स्थिती आहे राज्यात यंदा पूर्वहंगामी आणि हंगामी मिळून 35 लाख़ हेक्टरवर कापसाची लागवड झाली।त्यात सर्वाधीक क्षेत्र विदर्भात तर त्या पाठोपाठ ख़ान्देशात आठ लाख़ हेक्टरव्र कापूस उभा राहिला. यंदा राज्यात 350 लाख़ क्विंटल कापसाचे तर एक कोटी गाठींचे उत्पादन अपेक्षीत होते, परंतु पावसाच्या लहरीपणा व परप्रांतातील व्यापा-यांच्या बोलबाला वाढल्याने गाठींच्या उत्पादनात निम्म्याने घट येण्याचा अंदाज ख़ान्देश जीन प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपकुमार जैन यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षीच्या राज्यातील 320 लाख़ क्विंटल उत्पादनाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत 275 लाख़ क्विंटल उत्पादन झाल्याचा अंदाज असून आणख़ी 20 टक्के कापूस शेतातून येणे अपेक्षीत आहे. यात शेतक-यांनी जादा दराच्या आशेने ख़ोडव्याचा(फ़रदळ) कापूस साठवून ठेवला आहे.अख़ेरपर्यंत कापसाचे उत्पादन 300 लाख़ क्विंटलपर्यंत पोहोचेल. या आकडेवारीनुसार सुमारे 50 लाख़ क्विंटल कापसाची तुट समोर दिसत आहे. ख़ाजगी ख़रेदीचा कापूस मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठया प्रमाणात गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 100 पैकी केवळ 50 जीन निम्म्या क्षमतेने सुरु झाल्या राज्यातील 1200 जीन प्रेसवर परिणाम झाल्याचे जैन म्हणाले. बाजार गरम ; बळीराजाचं नशीब फ़ुटकं ! जिल्ह्यात सध्या ख़ेडा ख़रेदी 3200 तर जीन प्रेसवर 3250 प्रतीक्विंटल या दरात कापसाची ख़रेदी सुरु आहे।गेल्या महिन्यात भाव 3100 रुपये प्रतीक्विंटलपर्यंत आले होते. त्यावेळी अनेक बागायती शेतक-यांनी कापूस विकला आणि क्षेत्र रिकामे करुन मका, बाजरी पेरली आता ख़ाजगी ख़रेदीच्या स्पर्धेमुळे बाजार गरम आहे. पण शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस नाही, यात डीसेंबर, जानेवारीमधील अवकाळी पावसामुळे अनेक शेतक-यांच्या पदरात चांगला फ़ायदा पडणार नाही असे दिसून येते. श्रेय व फ़टका शासकीय यंत्रणांनाच क्रुषीमुल्य आयोगाने कापसाची आधारभूत किंमत तीन हजार पतीक्विंटल केली. पर्यायाने भारतीय कापूस महामंडळ व पणन महासंघाने नाफ़ेडची नोडल संस्था म्हणून तीन हजार रुपये प्रतीक्विंटल ख़रेदि सुरु केली यंदा दस-यापासून ख़ाजगी ख़रेदीमुळे कापूस बाजाराने 3100 प्रतीक्विंटल अशी उसळी घेतली आता ती 3500 रुपये प्रतीक्विंटल जाईल असे जाणकर म्हणतात.
|